जिल्हा विद्युत समन्वय समितीची बैठक

| पेण | वार्ताहर |

केंद्र शासनाकडून राज्यातील विद्युत प्रणाली बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याबाबत जिल्हा विद्युत समिती, अलिबाग-यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. समितीचे आयोजक व भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनिल काकडे तसेच पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता इब्राहीम मुलाणी सोबत समितीचे अध्यक्ष खा. श्रीरंग बारणे, खा. सुनिल तटकरे, डॉ.योगेश म्हसे, आ. भरत गोगावले उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या पूर्णत्वास आलेले प्रकल्प उदा. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम, एसएसएमआर तसेच एनसीआरएमपी-2 तसेच प्रस्तावित कोकण आपत्ती सौमीकरण योजना बाबत माहिती दिली तद नंतर केंद्र शासनाच्या निधी अंतर्गत प्रस्तावित आरडीएसएस बाबतच्या आधुनिकीकरण / वितरण हानी कमी करणे / फिडर वेगळे करणे इत्यादी माहितीचे संगणकीय माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सन्मानिय समिती सदस्यांनी सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या विविध ग्राहकाभिमुख योजनांची अंमलबजावणी नियोजित केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी सन्मानिय समिती सदस्यांनी दिलेल्या इतर सूचनांची नोंद महावितरणने घेतली.

Exit mobile version