प्राथमिक शिक्षक पतपेढीची सभा उत्साहात

| खरोशी | वार्ताहर |

पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची 100 वी वार्षिक सभा 4 ऑगस्ट रोजी आगरी समाज विकास मंच सभागृह पेण येथे चेअरमन मोहन भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

दीप प्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन करून ईशस्तवन, स्वागतगीत संस्थेच्या गीताने सभेची सुरुवात झाली. संस्थेचे चेअरमन मोहन भोईर, व्हाईस चेअरमन उज्ज्वला कनोजे, मानद सचिव सोपान चांदे व सर्व संचालक मंडळाचे संस्थेचे सचिव नितीन वर्तक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष व पेण तालुक्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन व संचालकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, पेणमधील सुहित जीवन ट्रस्ट आणि आई डे केयर या संस्थांतील मतिमंद विद्यार्थ्यांनी बनवलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.

अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर साधक बाधक चर्चा करून संस्थेच्या सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना संस्थेचे चेअरमन व सभा अध्यक्ष मोहन भोईर व संस्थेचे सचिव सोपान चांदे यांनी उत्तरे देऊन सभासदांच्या शंकांचे निरसन केले. शेवटी मानद सचिव सोपान चांदे यांनी उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रीय गीतानंतर सभेची सांगता झाली. या सभेस 1799 सभासद उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद, संस्थेचे सचिव नितीन वर्तक आणि कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version