आयपीसीएल प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक

निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा उपोषणचा इशारा

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्यातील आयपीसीएल (रिलायन्स) प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत विकास आयुक्त (उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर, 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसदर्भात एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन मंगळवारी (दि.6) दुपारी 3.30 वाजता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. याची माहिती रायगडचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे विकास आयुक्त (उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर, 2923 रोजी आयपीसीएल(रिलायन्स) प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या निर्देशानुसार आयपीसीएल(रिलायन्स) कंपनी प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांची 23 जानेवारीला दुपारी 1.00 वा. आयोजित करण्यात आलेली ही बैठक काही प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली होती. तीच बैठक आता 6 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान आयपीसीएल(रिलायन्स) प्रकल्पग्रस्तांना नोकरी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसदर्भात रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत योग्य निर्णय दिला नाही तर आयपीसीएलचे (रिलायन्स) सर्व प्रकल्पग्रस्त अलिबाग येथे जिल्हाधिरी कार्यालयासमोर पुन्हा उपोषणाला बसतील असा इशारा प्रकल्पग्रस्तांच्या भूमीपूत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था, चोळे ते नागोठणे या संघटनेचे अध्यक्ष गंगाराम मिणमिणे यांनी दिला आहे.

Exit mobile version