राज्यात मेगा पोलीस भरती

31 डिसेंबरपूर्वी 5 हजार 200 रिक्त पदे भरणार
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची मेगाभरती केली जाणार आहे. 31 डिसेंबरआधी 5 हजार 200 पदं भरण्यात येणार आहेत. त्यानंतर सात हजार पदं भरले जातील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी 5 हजार 200 पदांची भर्ती करण्यात येणार असून, त्यानंतर 7 हजार पदं भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, बर्‍याच दिवसांपासून रखडलेली पोलीस भरती आहे. त्या पोलीस भरतीच्या संदर्भातील निर्णय आम्ही घेतलेला आहे. सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी ही 5 हजार 200 पदांची भरती करण्याचा निर्णय केलेला आहे. यासाठी कॅबिनेटनं मंजुरीही दिली आहे. अशी आणखी 7 हजार पदं आहेत. या पदांचा निर्णय मार्गी लागल्यानंतर आपण आणखी त्या 7 हजार पदांचीही भरती करण्याचा निर्णय घेणार आहोत. यासंदर्भातील प्रक्रियाही लवकरात लवकर सुरु केली जाईल, अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Exit mobile version