| वाशिम | प्रतिनिधी |
एका मतिमंद मुलाने त्याच्या जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगडाने वार करून जीवे मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात बुधवारी (दि.8) रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. निवृत्ती पुंजाजी नरवाडे (65) असे मृत वडिलांचं नाव आहे. तर गणेश निवृत्ती नरवाडे (25) असे आरोपी वेडसर मुलाचं नाव आहे. मृत वडील निवृत्ती नरवाडे आणि त्यांचा वेडसर मनोरुग्ण मुलगा गणेश नरवाडे हे दोघेही घरात असताना गणेशने अचानक वडिलांच्या डोक्यावर दगडाने वार केले. या हल्ल्यात निवृत्ती नरवाडे मोठ्या प्रमाणात जखमी झाले, त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने निवृत्ती नरवाडे जमिनीवर कोसळले आणि यांचा जागीच मृत्यू झाला.