औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विदयार्थ्यांचा गुणगौरव

| नागोठणे । वार्ताहर ।
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया अंतर्गत येत असलेल्या शासकिय प्रशिक्षण संस्था नागोठणे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दि. 24 जानेवारी रोजी संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्या पी.पी. चव्हाण यांच्या हस्ते विभागीय पातळीवरील तंत्र प्रदर्शनामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे येथील विजतंत्री विभागातील चखछख ठएऋठखॠएठ-ढजठ या प्रोजेक्ट साठी प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विजेत्या विद्यार्थी अवंतिका पाटील, रिया नाईक, श्रवण नटे संकेत या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नखाते यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे ग. नि. हजारे, ग. नि. भगत, निदेशक नखाते, प्रशांत पाटील, गीता म्हात्रे, शिंदे, वारे, वाव्हळ,बाक्कर, बारगुडे, एन डब्लू पाटील आणि सर्व कर्मचारी वर्ग, बहुसंख्येने विद्यार्थी हजर होते.

Exit mobile version