‘संजीवनी’कडून गुणीजनांचा होणार गौरव

| चिरनेर | प्रतिनिधी |

संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणीजणांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 3 मार्च 2024 रोजी संगमनेर-मालपणी हेल्थ क्लब येथे सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये उरण तालुक्यातील कलासक्त कलायात्री दत्ता हरी भोईर यांनाही हा मानाचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, आमदार किरण लहामटे, महाराष्ट्रभूषण पद्मश्री तात्याराव लहाने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव उत्कर्षा रूपवते, युवा नेते कृष्णराज महाडिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संजीवनी फाऊंडेशनचे चेअरमन ज्ञानेश्‍वर सानप, खजिनदार रोशन सानप, सचिव गणेश सांगळे यांनी दिली. सध्या या कार्यक्रमाची जोरदारपणे तयारी सुरू असून, संजीवनी फाऊंडेशनचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version