| कर्जत | वृत्तसंस्था |
विद्याप्रसारिणी सभा चौक संचलित विद्यामंदिर सारंग शाळेत एस. एस. सी. परीक्षा मार्च 2024, आठवी व नववी वार्षिक परीक्षा एप्रिल 2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच प्रमुख अतिथी लघु उद्योजक सचिन दळवी यांच्या हस्ते व कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा विद्याप्रसारिणी सभा चौक संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पूजन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थिनींनी सुमधुर अशा स्वरात ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रकमेची पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे सचिन दळवी यांनी दुःखातून सुखाचा आनंद घेणे, आपल्यातील गुण शोधले पाहिजेत, त्याचबरोबर आपली, माझी या शब्दातील आपुलकी गुण या मुद्द्यांना अनुसरून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभा देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना कृतीची जोड द्यावी. ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या, नेहमी आई-वडील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्काराचे मूल्य जपा. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते अतूट असते असे मार्गदर्शन सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक पंडित पाटील यांनी केले. याप्रसंगी उदय देशमुख, दीपक पांडव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभांगी शिंदे यांनी केले. योजना म्हात्रे विदयार्थी यादी वाचन केले. मच्छिंद्रनाथ बाविस्कर यांनी मनोगत व आभार प्रदर्शन केले.