म्हसळा: वरवठणे येथे विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातीलवरवठणे येथे विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या दोन महिन्यात म्हसळयात तीन गळफास तर एक पाण्यात पडुन मृत्यू झाल्याची ही चौथी घटना घडली.


वरवठणे येथील मोहल्ल्या शेजारील विहिरीच्या कठड्यावर उभा राहुन १५ वर्षाचा शाळकरी मुलचा मासेमारी करत असताना विहिरीत पडुन मृत्यू झाला. या मुलाचे नाव जैद जमीर शिरशिकर असे आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. जैद हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. गावातील मुलांसोबत तो विहिरीवर गेला असता मासेमारी करताना चक्कर येऊन तो विहीरीत पडल्याचे सांगण्यात आले.


त्याच्या सवंगडयानी जैद विहीरीत पडल्याची माहिती ग्रामस्थांना दिली आता त्याला विहिरीमधून बाहेर काढून पुढील उपचरासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णायामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे घोषीत केले.


या घटनेची म्हसळा पोलिस ठाण्यात जमीर शिरशिकर वय वर्षे 45 यांनी खबर दिली असता पोलिसांनी आकस्मात मृत्यु म्हणून नोंद केली आहे. याबाबत पी.एस.आय.ए.बी.वैरामले हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version