मिहिर दास यांचे निधन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ओडिया सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिहिर दास यांचे मंगळवारी (11 जानेवारी) निधन झाले, ते 63 वर्षांचे होते. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा इथे जन्मलेल्या मिहिर दास यांनी ओडिया आर्ट फिल्म स्कूल मास्टरमधून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ’मथुरा बिजय’मध्ये (1979) काम केले. लक्ष्मी प्रतिमा (1998) आणि फेरिया मो सुना भाऊनी (2005) मधील अभिनयासाठी त्यांना राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. मु ताटे लव करुची (2007) या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला.

Exit mobile version