व्हाट्सअँप हॅक करून लाखोंची फसवणूक

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने व्हॉटसअ‍ॅप हॅक करणार्‍या एका विदेशी नागरिकाला अटक केली आहे. दिल्ली सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक पी.एस. मल्होत्रा यांनी सांगितलं की, व्हॉटसअ‍ॅप हॅक करणारी ही टोळी दिल्ली आणि बंगळुरुमधून काम करत होती. या प्रकरणी पोलिसांनी विदेशी नागरिक असलेल्या चिमेलून इम्मानुएल याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक लॅपटॉप आणि 15 मोबाइल फोन जप्त केले आहे.
ही टोळी लॅपटॉपमधल्या एका ऍप्लिकेशनच्या मदतीने लोकांचे व्हॉटसअ‍ॅप अकाऊंट हॅक करायची. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाइलमधले मेसेज आणि संपर्क आरोपीच्या लॅपटॉपमध्ये यायचे. हॅक केल्यानंतर ही गँग त्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांशी संपर्क साधायची आणि त्यांच्याकडे पैसे मागायची. त्यामुळे त्या लोकांना वाटायचं की आपला मित्र किंवा नातेवाईकच आपल्याकडे पैसे मागत आहेत. अशा प्रकारे कॉन्टॅक्टमधल्या इतर लोकांची थहरीींरिि हॅक करुन ही टोळी त्यांनाही लुटत होती.

Exit mobile version