| मुंबई | वृत्तसंस्था |
मराठा आंदोलनाला ‘एमआयएम’ पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे एक पत्रक पक्षाने जारी केले आहे. मराठा आरक्षणाला मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा वाढत असताना एमआयएम मुंबई प्रदेशचे जनरल सेक्रेटरी अन्वर शेख यांनी मराठा आरक्षणाच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
अन्वर शेख म्हणाले की, इतिहास पाहता मराठा समाजाने नेहमीच मुस्लिम समाजाच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिमही होते. त्याच भूमिकेतून आम्ही आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांच्या सोबत चालणार आहोत. 20 जानेवारीला मराठ्यांचा मुंबईत मोठा मोर्चा धडकणार आहे. आम्ही पक्षाच्या वतीने जरांगे पाटील यांचे स्वागत करणार आहोत आणि त्यांच्यासोबत मोर्चात सहभाग घेणार असल्याचे अन्वर शेख यांनी सांगितले.
एमआयएमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
