| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईमध्ये 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या कांदिवली परिसरात ही घटना घडली. मित्रांनीच आपल्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट करत मुलीला धमकावले. याप्रकरणी तिघांविरोधात समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या कांदिवलीमध्ये 17 वर्षांच्या मुलीवर मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कार करून त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 6 जानेवारीला ही घटना घडली असून ती आता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला आरोपींनी बोलावरून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्याचा व्हिडीओ देखील शूट केला. आरोपी 18, 20 आणि 21 वयोगटातील आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. या तिघांविरोधात समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समता नगर पोलिसांनी तिघांविरोधात बलात्कार, सामूहिक बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तिन्ही आरोपींविरोधात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून त्यांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.