| पनवेल | वार्ताहर |
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल थडराई हे बारापाडा, पनवेल येथे राहत असून, त्यांची 14 वर्षीय बहीण शाळेत जाते, असे सांगून घरातून निघून गेली आणि परतलीच नाही. तिचा वर्ण सावळा, बांधा मध्यम, उंची पाच फूट आहे. या मुलीबाबत अधिक माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुभाष डिगे यांनी केले आहे.
अल्पवयीन मुलीचे पनवेलमधून अपहरण
