मीराबाई चानूने रचला इतिहास

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाडली छाप; गोल्ड मेडलची हॅट्ट्रीक

| ग्लासगो | वृत्तसंस्था |

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घातली आहे. ग्लासगो येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ 2026 स्पर्धेतील वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 48 किलोग्रॅम वजनी गटात मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने 190 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यासह हे कॉमनवेल्थ स्पर्धेत तिचं सलग तिसरं सुवर्णपदक ठरलं आहे.

मीराबाई चानूचं हे कॉमनवेल्थ स्पर्धेतील सलग तिसरं सुवर्णपदक आहे. याआधी 2018 आणि 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही मीराबाई चानूने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. पण यावेळी मीराबाई चानूला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. तिने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात 82 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने 82 किलो वजन उचलून दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात तिने 85 किलो वजन उचलून कॉमनवेल्थ गेम्समधील नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

Exit mobile version