आ. जयंत पाटील यांच्याकडून म्हात्रे परिवाराचे सांत्वन

| अलिबाग | प्रतिनिधी |

तालुक्यातील लोणारे येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्येकर्ते सतीश चिंतू म्हात्रे यांच्या आई वंदना चिंतू म्हात्रे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (दि. 17) निधन झाले. निधनसमयी त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी सोमवारी म्हात्रे यांच्या निवासस्थानी जात कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या.

कै. वंदना म्हात्रे यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवारी (दि. 26) होणार आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर, काका ठाकूर, तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकार्‍यांनी म्हात्रे कुटुंबियांची भेट त्यांचे सांत्वन केले.

Exit mobile version