नॅशनल फिशरीस डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्यपदी आ.रमेश पाटील

| नवी मुंबई | प्रतिनिधी |
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,भाजपचे आ. रमेश पाटील यांची भारत सरकारच्या नॅशनल फिशरीस डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य पदी महाराष्ट्र राज्यातून एकमेव निवड करण्यात आली आहे.

आमदार रमेश पाटील कोळी महासंघाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे मागील अनेक वर्षापासून नेतृत्व करीत आहेत.तसेच मागील पाच वर्षांपासून राज्यावर आलेल्या चक्री वादळाचा तढाका बसला.त्यावेळी त्यांनी मच्छीमारांना मदतीचा हात देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जीवाचे रान केले.तसेच विधिमंडळात देखील वेळोवेळी आवाज उठवला. त्यामुळे त्यांची निवड म्हणजे खर्या अर्थाने कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचा सन्मान असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मच्छिमार बांधवांना भेट मिळाली असल्याचे मत प्रवाह व्यक्त होत आहे.
कोळी महासंघ नेहमीच कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांच्या उन्नतीकरिता प्रयत्न करत असून यापुढील काळातही नॅशनल फिशरीस डेव्हलपमेंट बोर्डाच्यामाध्यमातून विविध योजनांचा लाभ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील मच्छिमार बांधवांना मिळवून दिला जाईल. तसेच त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्‍न सोडण्यास गती मिळेल असा विश्‍वास स्थानिक मच्छीमार संघटनेतील नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version