| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशी बाबत रायगड लाच लुचपत विभागाने नोटीस पाठवली. गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश नोटीस द्वारे मालप यांना देण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रायगड लाच लुचपत विभागाने आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ते बाबत चौकशी केली आहे. 20 जानेवारी रोजी आमदार साळवी यांची सहा तास अलिबाग येथे लाच लुचपत कार्यालयात चौकशी झाली होती. यावेळी साळवी यांनी चौकशीला सहकार्य केले असून काही कागदपत्रांची मागणी विभागामार्फत मागितली आहे. ही माहिती 10 फेब्रुवारी पर्यंत आमदार साळवी यांना सादर करायची आहे. तत्पूर्वीच साळवी यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांनाही बाबत चौकशीला हजर राहण्याबाबत दोन दिवसापूर्वी नोटीस पाठवली होती.
सुभाष मालप यांना 2 फेब्रुवारी रोजी अलिबाग लाच लुचपत कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर राहण्याबाबत नोटिसद्वारे कळविण्यात आले होते. मात्र मालप हे गुरुवारी चौकशीला गैरहजर राहिले होते. मालप यांनी कार्यालयात हजर राहणार की नाही, याबाबत कळविण्यात आले नसल्याचे लाच प्रशासनाने सांगितले. मात्र स्वीय यांनाही नोटीस पाठविण्यात आल्याने आमदार साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.