मनसेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. हेमलता चिंबुळकर

| रसायनी | वार्ताहर |

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. हेमलता प्रभाकर चिंबुळकर यांची नुकतीच निवड करण्यात आली असून, त्यांना मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.

डॉ. हेमलता चिंबुळकर यांनी खालापूर तालुका महीला आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून पार पाडली असून, तालुक्यात महिला संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना नियुक्ती पत्रक मनसे नेते माजी आमदार नितीन सरदसाई यांच्या हस्ते देण्यात आले.

Exit mobile version