रसायनी विनयभंग प्रकरण: डाॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

नागरिक रस्त्यावर उतरले; बाजारपेठा बंद

| रसायनी | वार्ताहर |

रूग्ण महिला व तिच्या कुटुंबियांशी असभ्य वर्तन करणाऱ्या डॉ.मंगेश बंग यांच्याविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी रसायनी परिसरातील सर्व पक्षीयांतर्फ बंद पाळण्यात आला. तसेच, या डॉक्टरांच्याविरोधात रसायनी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. डॉक्टरने धक्के मारून बाहेर काढल्याचा प्रकार रिस (रसायनी)येथील हॉस्पिटलमध्ये घडला होता. डॉ.मंगेश बंग यांच्या हॉस्पिटलमध्ये समरीन कुरेशी ही महिला उपचार घेत होती. रूग्ण महिलेच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांचा भाऊ रेहमान लांबतुरे हे आरोपी डॉक्टर मंगेश बंग यांना विचारपूस करण्यासाठी गेले असता त्याचा राग मनात धरून डॉक्टरने त्यास शिवीगाळी व दमदाटी केली. धक्के मारून हॉस्पिटलच्या बाहेर काढले. त्या वेळी त्यांनी रूग्ण महिलेचा हात पकडून, ओढून स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून, तक्रारदार महिलेस धक्के मारून हॉस्पिटलच्या बाहेर काढून, ‌‘तुम्हारी औकात नही है, तो झक मारने आयी क्यो.?’ असेही म्हटले.

रसायनी पोलिसांनी सुरूवातीला डॉक्टर विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र या घटनेबद्दल लोकभावना तीव्र होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी व परिसरात पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून बुधवारी (12 जुलै ) मोहोपाडा, चांभार्ली, वावेघर रिस दांडफाटा, पराडे, येथील बाजारपेठा दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेऊन सर्व पक्षीयांनी मोहोपाडा येथे निषेध मोर्चा काढला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रूघ्न माळी यांनी आरोपी डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी हे तपास करत आहेत.

माजी सरपंच ताई पवार,माजी सरपंच संदीप मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे,कॉग्रेस आयचे सागर सुखदरे, संतोष चौधरी, अनंता दळवी, दीपक कांबळी, केदार शिंदे, मंगेश पांगत, विनोद सावंत, संदीप साळुंखे, सुरेश म्हात्रे, संतोष पांगत, अनिल खराडे, स्वप्निल राऊत, अनिल पिंगळे, प्रशांत तांबोळी, लाला ब्रिगेड तथा शेकापचे जगदीश पवार, शेकापचे संदीप म्हात्रे, प्रल्हाद मुंढे, प्रदीप पाटील, मंगेश पाटील, प्रशांत मोकाशी, आशिष जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे दीपक कांबळे, आकाश कांबळे व दयानंद सरवदे, पंकज सोनावळे, अविनाश कांबळे, रमेश कांबळे आदीं उपस्थित होते.

Exit mobile version