| नेरळ | प्रतिनिधी |
आसे येथील 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग होण्याची घटना घडली. विशेष म्हणजे मुलीच्या पालकांनी त्या युवकाच्या घरी तक्रार करुनही त्या मुलाच्या वडिलांनीच प्रोत्साहन देण्याचा प्रकार घडला. याबाबत अल्पवयीन मुलीची फसवणूक करून विनयभंग केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झालेल्या प्रकाराची माहिती मुलीच्या पालकांनी संबंधित मुलाच्या पालकांना देऊन असे करू नये अशी तंबी देण्याची मागणी केली. त्यावेळी संबंधित तरुणाच्या आई वडीलांनी उलट त्या तरुणाला प्रोत्साहन दिले आणि त्यामुळे हा प्रकार थांबला नाही. शेवटी त्या मुलीचे पालक पुन्हा त्या मुलाच्या घरी गेले असता त्या तरुणाच्या आई वडील यांनी त्या तरुणाला पाठीशी घालत त्या मुलीच्या वडिलांच्या अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली. त्याबद्दल अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर त्या तरुणाची आई वडील आणि तरुण या तिघांविरुद्ध नेरळ पोलीस ठाणे येथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.