| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील पळस्पे ते करंजाडे असे मोटारसायकलवरून येत असताना मोटार सायकलस्वारास रस्त्यावरील दुभाजक न दिसल्याने त्याच्यावर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश गावडे (30) हा त्याच्या सोबत असलेला अल्पेश कोलहकर (27) याच्या बरोबर पळस्पे ते करंजाडे असे मोटारसायकलवरून येत असताना अचानकपणे पाऊस आल्याने मोटारसायकल स्वारास रस्त्यावरील दुभाजक न दिसल्याने त्याच्यावर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात ऋषिकेश गावडे याचा दुर्देवी मृत्यू झाला. तर अल्पेश कोलहकर हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







