रोहा तालुक्यातील डोंगराना वणवेच वणवे

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यात वणवे लावण्याच्या प्रमाणात आता प्रचंड वाढ झाली असून अक्षरशः तालुकतातील डोंगरच्या डोंगर आगीच्या भस्मस्थानी होरपळतांना दिसत आहेत त्यामुळे प्रचंड वनसंपदेची हानी होत असल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली असून याकडे वनखात्याचे दुर्लक्ष व डोळे झाक होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे . दररोज डोंगरांना प्रचंड लावण्यात येत असलेल्या वणव्यामुळे रोहा तालुक्यातील कोलाड पुई,आंबेवाडी,वरसगाव,खांब, देवकान्हे, मालसई, या ठिकाणचे डोंगर सायंकाळच्या सुमारास अक्षरश: या वणव्यात होरपळताना दिसतात. शिकार करणे व इतर कामासाठी डोंगरांना वणवे लावण्याचा प्रमाण वाढत आहे.

Exit mobile version