प्रदीप बी.वाघमारे
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील तुर्भे हनुमान नगर, गणेश नगर, आंबेडकर नगर आणि इंदिरानगर येथील नागरिकांना सातत्याने डम्पिंग ग्राऊंडचा मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागला आहे. म्हणून उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे आणि तुर्भे विभाग प्रमुख तय्यब पटेल यांनी पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, शिवसेना उपनेते, तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा आणि ठाणे लोकसभा खा.राजन विचारे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देऊन सदर डम्पिंग ग्राउंड इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
यावेळी शिष्टमंडळात रिपाई (आठवले) तुर्भे विभाग अध्यक्ष विनोद वानखेडे, समाजसेवक संजय लांडगे, रिपाइंचे नवी मुंबई अध्यक्ष प्रकाश सुरवाडे, घर हक्क परिषदेचे नवी मुंबई अध्यक्ष दिगंबर जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच आम्ही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटणार असून त्यांनाही सदरचे डम्पिंग ग्राउंड इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे म्हणून साकडे घालणार असल्याचे उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे यांनी सांगितले.