एमपीएससीची कमाल संधीची मर्यादा रद्द

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा एमपीएससीकडून रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्‍चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंबंधीची घोषणा आज करण्यात आली आहे. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं आहे. एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. यूपीएससीच्या धरतीवर एमपीएससीनेही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्‍चित केली होती. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी सहा संधी, इतर मागासवर्गीयांसाठी नऊ संधी असा नियम मर्यादित करण्यात आली होता. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती. आता आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थींना संधी देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version