मुंबई हल्ल्यातील आरोपी राणाला भारतात आणणार

| मुंबई | प्रतिनिधी |

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. भारतीय कुटनीतीचा हे मोठं यश मानण्यात येत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजुरी दिली होती. त्यातंर्गतच आता राणाला लवकरच भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

राणावरील आरोप काय?
मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याचा हात असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. दोषारोपपत्रातसुद्धा त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयब्बाचा सक्रिय सदस्य असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडली याला राणा याने या हल्ल्यासाठी मदत केल्याचे तपासात समोर आले होते. त्याने हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे.
Exit mobile version