मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगाव बायपासचे काम एल. एन. ए. इन्फा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड कंपनी करते. या कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना शनिवारी (दि. 21) घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवनकुमार गोवर्धनसिंह खिचड (33), हे मौजे नाणोरे गावच्या हद्दीतील एल. एन. ए. इन्फा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड येथील कॉन्फरस हॉलमध्ये एकटेच बसले असताना आरोपी योगेश लाड व त्याच्या सोबत 9 ते 10 इसम तक्रारदार यांची पूर्व परवाणागी न घेता कॉन्फरस हॉलमध्ये आले. मुंबई- गोवा हायवे रोडचे इंदापुर बायपास ते माणगाव बायपासचे काम चालु ठेवने साठी व खर्डी क्रशर करीता ब्लास्टींग करणेसाठी तक्रारदार यांच्याकडे महिण्याला तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली असता, त्यावेळी पवनकुमार यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी योगेश लाड व त्याच्या सोबत 9 ते 10 लोकांनी ऑफीसमध्ये तसेच आफीसचे बाहेर तक्रारदार यांना शिवीगाळ करुन हाताबुक्यानी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच झालेल्या झटापटीमध्ये तक्रारदार याचे गळयातील सुमारे 8 तोळे वजनाची सोन्याची चैन व शर्टच्या वरच्या खीशातील 20000 रुपये कोठेतरी पडुन गहाळ झाले. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पो. नि. निवृती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. विजय सुर्वे करीत आहेत.

Exit mobile version