| मुंबई | प्रतिनिधी |
सप्टेंबरच्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात चांगली भर पडली असून आता तेथे 96.20 टक्के जलसाठा आहे. मुंबईतील चार तलाव शंभर टक्के भरले आहेत. तुलसी, विहार, तानसा आणि मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झालेत. तानसा आणि मोडकसागर मधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागच्यावर्षी याचवेळी या सात तलावात 98.17 टक्के जलसाठा शिल्लक होता.
पालघरमध्येही समाधानकारक तब्बल एक महीन्याच्या विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे. पावसाच्या पुनरागमनाने संकटात सापडलेल्या शेतीला जीवनदान मिळाले असून प्रमुख धरणांमध्ये एकूण 400 दलघमी इतका मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्याने वर्षभर पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न देखील सुटला आहे.