। मुंबई । प्रतिनिधी ।
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. कायदा सुव्यवस्थेप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ राजपाल राधाकृष्णनं यांना पत्र देणार आहे. भेटपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वराज्य संघटनेचे प्रमुख, मा. खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांना सवाल विचारले आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी पंकजा मुंडे का बोलत नाहीत? त्यांनी बोलायला पाहिजे. तसेच, तुरुंगात गेलेली माणसे धनंजय मुंडेंची कोण आहेत? असे प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केले आहेत. संभाजीराजे म्हणाले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर पंकजा मुंडे का बोलत नाहीत? त्यांनी बोलायला पाहिजे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा काही एका जातीचा मुद्दा नाही. हा महाराष्ट्राचा मुद्दे आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या केली आहे. असेच महाराष्ट्रात चालू राहिल. हे महाराष्ट्राला परवडणारे आहे का? मग कशाला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा काही संबंध नाही, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. त्याचे व्यावसायिक संबंध आहेत. वाल्मिक कराडला वटमुक्तीपत्र दिले आहे. वटमुक्तीपत्र कुणाला दिले जाते, जो विश्वासू आहे, असे संभाजीराजेंनी सांगितले.