| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषद शिक्षण विभागाच्या विद्यमाने अलिबाग नगरपरिषद प्राथमिक शाळा 1 ते 6 व उर्दु माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे दि.21 व 22 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दि.21) मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन बच्छाव, नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता माने, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संगीता माने यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोरोना काळानंतर तब्बल पाच वर्षांनी आज वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक व प्रशासनाचा मोठा हातभार लागल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी बच्छाव आणि उपशिक्षणाधिकारी भोपळे यांनी या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.