मैलपाणी वाहिन्या सफाईसाठी पालिका खरेदी करणार अत्याधुनिक वाहन

Sewage truck on worker pumping feces out of rental toilet for disposal and cleaning at the construction

| पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

पालिका हद्दीतील मैल पाणी वाहिन्यांची सफाई करण्यासाठी पालिका आठ अत्याधुनिक वाहन खरेदी करणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे पालिका हद्दीत पसरलेल्या जवळपास 260 किलोमीटर लांबीच्या शिवर लाईनची साफसफाई करणे पालिकेला सहज शक्य होणार आहे.

शिवर लाईन चॉक होऊन रस्त्यावर पसरणार्‍या सांडपाण्यामुळे पसरणार्‍या दुर्गंधी पासून नागरिकांची सुटका होणार आहे. पालिका हद्दीत समाविष्ठ सिडको वसाहतींमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी शिवर लाईनचे मोठे जाळे विणण्यात आले आहे. सुमारे 30 ते 35 वर्षा पूर्वी टाकण्यात आलेल्या या शिवर लाईन जुन्या आणि जीर्ण झाल्या असल्याने अनेक ठिकाणी शिवर लाईन च्या मॅन होल मधून सांड पाणी रस्त्यावर पसरत आहे. सिडको वसाहती मधील शिवर लाईन च्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम सिडको कडून करण्यात येत होते. सप्टेंबर 2022 पासून ही जवाबदारी पनवेल पालिकेकडे सोपवण्यात आली आहे.

शिवर लाईनची जवाबदारी स्वीकारण्यापूर्वी जुन्या आणि जीर्ण झालेल्या या लाईन सिडकोने दुरुस्ती करून द्याव्यात अथवा दुरुस्ती करता खर्च करावी लागणारी रक्कम सिडको ने पालिका प्रशासनाला द्यावी, अशी मागणी पालिका प्रशासनाने केली होती. सिडकोने मात्र पालिकेच्या मागणीकडे दुर्लक्ष शिवर लाईनची जवाबदारी पालिकेवर टाकल्याने हे आव्हान यशस्वी पणे पेलण्यासाठी पालिका प्रशासन तैयारीला लागलं आहे.

शिवर लाईनच्या देखभाल आणि दुरुस्ती करता पालिका प्रशासन खरेदी करणार असलेल्या आठ वाहनानमध्ये सहा सक्षण जेटिंग अँड रोडींग मशीन, दोन सक्षण कम जेटिंग रिसायकल मशीनचा समावेश आहे. या मशीन चालवण्यासाठी पाच वर्षा करिता खाजगी कंत्राट दाराची निवड करण्यात येणार आहे.

प्रीतम पाटील
पालिका अधिकारी

पालिकेच्या कामा बाबत नागरीक समाधानी
पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या शिवर लाईन बद्दल तक्रार करताच पालिका अधिकारी दखल घेत दुरुस्ती करत असल्याने पालिकेच्या कामा बद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Exit mobile version