मुरुड पर्यटकांनी बहरले

समुद्रकिनारी वाळूत पार्किंग करून लाटांचा आनंद घेतला
। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. मुरुड सह श्रीवर्धन, अलिबाग, नागाव, रेवदंडा, आक्षी, किहीम आदी सह सर्वच ठिकाणे पर्यटकांनी हौस फुल झाली आहेत
समुद्र किनारी मोठ्या संख्येने पर्यटक अवतरले असून तीन दिवसांची सुट्टीचा आनंद घेत आहेत. रविवारी जंजिरा किल्ल्यावर सुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळाली. औरंगाबाद, लातूर, परभणी, मुंबई, कल्याण, डोंबवली, विरार, दहिसर, ठाणे आदी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे हजर झाले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत असून काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. परंतु ट्रॉफिक हवालदार आपली भूमिका चोख बजावत असल्याने वाहतुकीस रस्ता मोकळा करण्यात आला.
पर्यटकांमुळे मुख्य बाजारपेठेत सुद्धा गर्दी दिसून आली. विविध वस्तू खरेदीसाठी पर्यटक बाजारपेठेत सुद्धा आले होते. समुद्र स्नान, बोटिंग, उंट सफारी, बनाना रायडिंग आदींचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते.

सलग सुट्टीत मुरुड-जंजिरा किल्ला पहाण्यासाठी हजारो पर्यटक येतात. पूर्वी आम्ही सायंकाळी 7 वाजेपर्यंत किल्ल्यातून पर्यटकांना घेऊन येत असत. पण आता पुरतत्व खात्याने किल्ल्यात गेट बनवला आहे व तो 5 वाजता बंद करतात, त्यामुळे हजारो पर्यंत सायंकाळी पर्यटक परत जातात. त्यामळे ही वेळ वाढवून द्यावी.
रिजवान कारभारी, बोट मालक

Exit mobile version