वाहनाच्या धडकीने माकडीचा पिल्लासह मृत्यू
| अगरदांडा | वार्ताहर |
अन्नाच्या शोधात डोंगर दर्यातून भटकणाणार्या एका माकडीण आणि तिच्या पिल्लाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने मृत्यू ओढावण्याची घटना मिठागर भालगांव रत्यावर घडली.
लंगूर जातीचे माकड आपलं खाद्य खाण्यासाठी रस्त्यावर ये-जा करित असतात.त्यापैकी 3 वर्षाची माकडीन व तिचा पिल्लु अंदाजे 1 महिन्यांच्या पिल्लाला घेऊन रस्ता ओलांडताना भरधाव अज्ञात गाडीने उडविल्याने माकडीनीचा जागेवर मृत्यू झाला तर पिल्लु तडफडत होते त्याच रस्त्यावर प्रवास करणारे डोंबिवली येथील मनोज कुलकर्णी घटनास्थळी थांबुन दोन्ही लंगुर माकड जीवंत आहेत का ते पाहिले. त्यामध्ये माकडीनीचा मृत्यू झाला तर तिचा पिल्लु जिवंत होते. मनोज कुलकर्णी यांनी पिल्लाला पाणी पाजल्यावर काही वेळ पिल्लु जिवंत राहिले. पण अपघाताची ठोकर ऐवढी मोठी होती त्याला बसता येत नव्हते शांत पडून होते. काही तासाने त्याचाही मृत्यू झाला.
ही बातमी सर्पमित्र संदीप घरत याला मिळताच मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सागर रसाळ, वनविभाग अधिकारी मुरुड-दिनेश रोटकर आदिंसह घटनास्थळी पोचुंन मुत्यू पावलेल्या दोन्ही लंगुर जातीच्या माकडीनचा व पिल्लाचा पंचनामा करून त्यांना मुरुडला आणून दोघांच्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले.