। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आवास येथील बा.ना. हायस्कूल शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि.2 व 3 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात नागांव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या विज्ञान प्रदर्शनात नागांव हायस्कूलमधील इ. 6वी व 8वीच्या गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सनाया भुकवार व काव्या शहाबाजकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच, इ.9वी ते 12वीच्या गटात विज्ञान प्रतिकृतीमध्ये राधिका वर्तक, कार्तिकी कवळे व कार्तिक पाटील यांनी देखील तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच, या प्रतिकृतीची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशासाठी नागांव हायस्कुलचे शिक्षक जान्हवी बनकर, मंजुषा पाटील, सुप्रिया पाटील, मोहन पाटील, गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक ए.जी. पाटील, तनिष्का नाईक, वर्षा पाटील, मनोज कासार तसेच संस्थेचे पदाधिकारी व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.