नागोठणे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

शिवशंभू इलेव्हन आंबोलेवाडी यांच्यावतीने श्री छत्रपती चषकानिमित्त मर्यादित षटकं आर्म क्रिकेटचे सामने शनिवार व रविवार रोजी जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण पाली येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत 24 संघांनी आपला प्रवेश निश्चित केला होता. या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपन युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत सुमित दादा काते प्रतिष्ठान नागोठणे विरुद्ध शिव शंभू इलेव्हन आंबेलेवाडी या संघात झाली. सुमित दादा काते प्रतिष्ठान नागोठणे हा संघ प्रथम क्रमांकांचा मानकरी ठरला. या संघास रोख रक्कम 30 हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाचा मानकरी शिव शंभू इलेव्हन आंबेलेवाडी या संघास रोख रक्कम 20 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक अगस्त इलेव्हन वैतागवाडी या संघास 10 हजार व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक दत्तगुरुक्लब भार्जेवाडी अ या संघास रोख रक्कम 7 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच, या स्पर्धेतील सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना देखील आकर्षक बक्षीस देऊन मंडळाच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version