| उरण | वार्ताहर |
मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील गोदामावर नैना प्राधिकरण (अतिक्रमण )विभागाने कारवाईचा बुलडोझर फिरवला आहे. मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे गट क्रमांक 167/1 या जागेवर कलीम बिन्ना शाह व आरीफ बिन्ना शाह या व्यवसायिकांनी सिडकोच्या नैना प्राधिकरण विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गोदामांचे बांधकाम उभे केले होते. या संदर्भात सिडकोच्या नैना विभागाकडे तक्रार दाखल होताच कलीम बिन्ना शाह व आरीफ बिन्ना शाह या व्यवसायिकांना नोटीस बजावण्यात आली होती.परंतु सदर व्यवसायिकांनी योग्य ती कागदपत्रांची पूर्तता सादर न केल्याने सदर गोदामावर पोलीस फौजफाट्यासह मंगळवारी ( दि11)कारवाईचा बुलडोझर नैना विभागाने फिरवून सदर गोदाम जमिनदोस्त केले आहे.यावेळी नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ अभियंता नवनीत सोनावणे,प्रताप नलावडे,सागर महिंद्र, प्रमोद पाटील हे अधिकारी उपस्थित होते तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.