मंगळागौर स्पर्धेत नामदेव शिंपी महिला मंडळाची बाजी

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुरुड तालुका मर्यादित मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुरुडच्या संत शिरोमणी नामदेव शिंपी महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना सात हजार रोख व आकर्षक सन्मानपत्र माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, मुग्धा दांडेकर, परीक्षक स्नेहा आंब्रे, तालुका महिला अध्यक्ष अ‍ॅड. मृणाल खोत, प्रमिला माळी, माजी सभापती स्मिता खेडेकर, विश्‍वा वर्तक, जुईली गुंजाळ, विजय पैर व विद्या मसाल आदी उपस्थित होत्या. या स्पर्धेचे परीक्षण नेहा आंब्रे यांनी केले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक : संत शिरोमणी नामदेव शिंपी महिला मंडळ, मुरुड, द्वितीय : सखी महिला मंडळ, मुरुड, तृतीय : गणेश आळी महिलांना मंडळ, मुरुड, उत्तेजनार्थ : अंबा भवानी महिला मंडळ, नांदगाव, गावदेवी महिला मंडळ, मुरुड यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या नामदेव शिंपी समाजाच्या महिला मंडळाने 20 मिनिटांच्या वेळेच्या बंधनामध्ये 29 मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण न थकता केले.पारंपरिक वेशभूषा, त्याची रंगसंगती व गीतांचे सादरीकरण उत्तम केल्याने त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. या स्पर्धेतील खेळ बसवण्याचे काम शिवानी नाझरे व रोशनी सदरे यांनी केले. गीतांचे सादरीकरण प्रतिभा बागडे यांनी केले.

Exit mobile version