नांदाई पाडा झाला प्रकाशमय

दिलीप भोईर यांच्या हस्ते 44 पथदिव्यांचे लोकार्पण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आगरसुरे ग्रामपंचायत हद्दीतील नांदाई पाडा ते वरद विनायक मंदिरापर्यंत 44 पथदिवे लावण्यात आले. त्यामुळे हा परिसर प्रकाशमय झाला. जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद सदस्य 15 वित्त आयोगातून हे विकासकाम करण्यात आले. या कामाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सायंकाळी झाला.

यावेळी जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शन भोईर, आगरसुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच जागृती पेढवी सीमा भोईर, सर्व सदस्य, महेश माने, राहुल भोईर, हरेश भोईर, रवी म्हात्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

नांदाई पाडा ते वरद विनायक मंदिर या सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या दुर्तफा पथदिवे नव्हते. रात्री-बेरात्री या मार्गावरून प्रवास करताना दंश करणार्‍या प्राण्यांची भीती होती. दिलीप भोईर यांनी येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकत या रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला. जिल्ह परिषद सदस्यांना मिळणार्‍या 15 वित्त आयोगातील प्राप्त निधी पथदिवे उभारणीसाठी खर्च केला. त्यामुळे हा परिसर प्रकाशित झाला.

Exit mobile version