नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर

पुन्हा तारीख पे तारीख
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गुरुवारी (दि.1) अलिबागच्या न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना 5 जानेवारी 2023 रोजीची तारीख दिली आहे. पुढील सुनावणीला हजर राहून या प्रकरणातून मुक्त करण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याचा अर्ज दाखल केल्याचे सुत्रांनी सांगितले.

राणे आज अलिबागमध्ये येणार असल्याने शहरात तसेच न्यायालयाच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपण आल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज न्यायालयात हजर राहिलो होतो. न्यायालयाने पुढील तारीख 5 जानेवारी 2023 दिली आहे. त्यादिवशी परत उपस्थित राहणार असून केस ही डिस्चार्ज करून घेण्याचा प्रयत्न करू असे राणे यांचे वकील मानशिंदे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version