आरोपी पोलिसांच्या ताब्यात
| पनवेल | वार्ताहर |
अंमली पदार्थ विरोधी पक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी खारघर येथून साडेपाच लाख रुपये किमतीचा 55 ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी जीशान अहमद आलम खान (24) यास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांना एक इसम अंमली पदार्थ गिऱ्हाईकांना विकण्यासाठी साई क्रिस्टल बिल्डिंगच्या समोरील रोडवर सेक्टर 35 खारघर या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. यावेळी आरोपी जीशान खान हा साई क्रिस्टल बिल्डिंगच्या समोरील रस्त्यावर येऊन थांबला होता. त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या ताब्यातून 55 ग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे.