| पनवेल | दीपक घरत |
मुबंई कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आलेले जवळपास 538 कोटी रुपये किमतीचे 140 किलो वजनाचे अमली पदार्थ तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुबंई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत शुक्रवारी ( दि.30) नष्ट करण्यात आले. अंतरराष्ट्रीय बाजारात विक्री साठी आणण्यात आलेले जवळपास 140 किलो वजनाचे अमली पदार्थ ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारतील किमत 538 कोटी रुपये आहे. मुबंई कस्टम विभाग 3 कडून जप्त करण्यात आले होते. न्यालयाच्या निर्देशनुसार शुक्रवारी तळोजा औद्योगिक वसाहती मधील मुबंई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत हे जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाई वेळी मुबंई कस्टम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.