वाढदिवसानिमित्त महिलांसाठी नथ मेकिंग प्रशिक्षण

| रसायनी | वार्ताहर |

जनसेवेसाठी कार्यरत असणारे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा येथील महिलांना नथ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी माधवी जोशी, ग्रामपंचायत सदस्या रसिका खराडे, दिपिका भंडारकर, प्रमोद धुरव आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी नथ मेकींग प्रशिक्षण सुरु केल्याबद्दल महिलांनी नरेश जोशी व माधवी जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

Exit mobile version