सुरेश पाटील यांना राष्ट्रीय आगरी पुरस्कार

| अलिबाग | प्रतिनिधी |

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांना अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आगरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवारी (दि.13) पेण येथील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात त्यांना राष्ट्रीय आगरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आगरी सामाजिक संस्थेने समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस सन्मानित करण्यात आले. शिक्षण, संगीत, व्यावसायिक, मेट्रो महिला चालक यांना पुरस्कार देण्यात आला. लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नारायण ठाकूर, नाशिकचे जि. प. सदस्य जनार्दन माळी, ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष अँड. पी. सी. पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. सहकारक्षेत्रातील अग्रगण्य आदर्श पतसंस्थेचे निर्मितीत मोलाचे योगदानाबद्दल त्यांची राष्ट्रीय आगरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना यापूर्वी सहकार शताब्दीनिमित्त रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून विभागीय सहनिबंधक याचे हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

Exit mobile version