कोंकण ज्ञानपीठात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

| कर्जत । वार्ताहर ।
कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या वतीने कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचीन भारतीय प्रतिमा शास्त्रातील नवीन संशोधन प्रवृत्ती – मंदिरे, लेणी, स्तुप, चैत्यग्रह आणि शैलचित्र या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे दोन दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत महाविद्यालय नांदेडचे डॉ. प्रभाकर देव यांच्या हस्ते समारंभाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अरविंद सोनटक्के, प्रदीपचंद्र श्रुंगारपुरे, झुलकरनैन डाभिया, रमेश ठाकूर, प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड, प्राचार्य रवींद्र कटके आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात राष्ट्रीय परिषदेचा उद्देश सांगितला. दुसर्‍या सत्रात डॉ. आंबलीका सूद जेकब, डॉ. किशोर गायकवाड, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. विलास वहाने यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन हनत शेख यांनी केले. या परिषदेत 60 पेक्षा अधिक संशोधन निबंध सादर करण्यात आले. तर देशातील 111 प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते. याप्रसंगी दीपक बोराडे, ज्ञानेश्‍वर जाधव, प्रा. किशोर शामा, बेवनाळे सौदागर, डॉ. डी. पी. हिंगमीरे, डॉ. एम. जी. लोणे, डॉ. पराग करूळकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version