चिखलप येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

| म्हसळा | वार्ताहर |

कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबई संचलित वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा यांच्या वार्षिक राष्ट्रीय सेवा योजना विशेष सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन म्हसळा तालुक्यातील मौजे चिखलप येथे करण्यात आले होते. या शिबिरात 100 विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण, प्रा.डॉ. जगदीश शिगवण सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये अंतर्गत परिसर विकास, शोष खड्डे, शाळा परिसर स्वच्छता, बौद्धवाडी ते म्हसळा गोरेगाव रोड जोड रस्ता दुरूस्ती, वनराई बंधारा, चिखलप ते म्हसळा माणगाव रोड जोड रस्ता दुरुस्ती, स्वच्छ भारत अभियान करण्यात आले.

शिबिराच्या सांगता समारंभास प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे, अनिल जोशी, मयूर पाखड, संतोष शिंदे, राजेंद्र जाधव, राजरत्न चाचले, काशिनाथ खेरटकर, प्रकाश मुंडे, सुशीला शिंदे, बंधीनी मुंडे, कंगना शिंदे, निजाम कागदी, सुरेंद्र शिर्के, शाहीद उकये, शाहनवाज उकये, शशिकांत शिर्के, एम.एस.जाधव, प्रा.डॉ.संजय बेंद्रे, प्रा.कानिफ भोसले, प्रा.डॉ.सिद्दीकी,ग्रामस्थ, महिला मंडळ शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन प्रा.सुमित चव्हाण ह्यांनी केले तर प्रा.जगदीश शिगवण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version