कडसुरे शाळेत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा

| शिहू | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कडसुरे येथे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या वेळी परीक्षेत्र नागोठणेचे वनपाल निलेश वार्डे, वनरक्षक बळीराम सदगर, शिक्षक भास्कर लेंडी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2 ते 7 ऑक्टॉबर दरम्यान, सर्वत्र साजरा केला जातो. वनस्पती आणी प्राणी यांचे संरक्षण आणी संवर्धन करण्याच्या उद्देशाने वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे, परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्षांच्या अधिवासवार मानवी आक्रमन यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबध येत नाही. नामशेष होत चाललेल्या वन्य पशु पक्षांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू असल्याचे वनपाल निलेश वार्डे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

Exit mobile version