। सुतारवाडी । वार्ताहर ।
कुडली, सुतारवाडी विभाग राष्ट्रवादी युवक कार्यकर्ता मेळावा येरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील झेड बॅक येथे आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना आ.अनिकेत तटकरे यानी मार्गदर्शन केले. संतोष दळवी, सागर खैर, बाळकृष्ण आयरे, प्रशांत म्हशीलकर, जगन्नाथ धनावडे, सरपंच मंगेश कदम, रुपेश तवटे, रविकांत कोदे, सिद्धेश शिर्के आदींनी युवकांच्या समस्ये विषयी आपले विचार व्यक्त केले. सुरुवातीला कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.