| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात लढत होत आहे. तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली जात आहे. नऊ हजारांपेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस समित्यांचे प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीद्वारे पक्षाध्यक्षाची निवड करणार आहेत. मतदानानंतर सीलबंद मतपेट्या मंगळवारी (दि.18) दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातील. बुधवारी (दि.19) मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतपत्रिकांची घोळ घातली जाणार आहे. 50 टक्क्यांहून अधिक मते मिळविणार्या उमेदवाराची काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली जाईल.