पालिका बनविणार मिनरल वॉटर; राज्य सरकारचा हिरवा कंदील
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटनस्थळी आलेले पर्यटक बाटलीबंद पाणी पिण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे आगामी काळात माथेरान पालिकेचे बाटलीबंद पाणी पर्यटकांना उपलब्ध होणार असून त्यासाठी राज्य सरकारने नैसर्गिक झर्यांना पुर्नजीवन देण्याच्या माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या या प्रस्तावित प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. तर शहरातील माथेरान पालिकेच्या अन्य चार प्रकल्पांना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने खा.श्रीरंग बारणे यांच्या पत्रानंतर पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माथेरान पालिकेच्या चार प्रकल्पांना पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यात माथेरान मध्ये येणार्या पर्यटकांना सतत बाटलीबंद पाणी पिण्याची आवश्यकता असते, हे लक्षात घेऊन माथेरानच्या जंगलात असलेले नैसर्गिक झरे जिवंत करण्याची आणि त्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा माथेरान पालिकेचा प्रयत्न राहिला आहे. पहिल्यापासून प्रयत्न केला आहे. आता शासनाने त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तावाला दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. शहरात भविष्यात बाहेरून मिनरल बॉटल आणावी लागणार नाही यासाठी माथेरान पालिका मिनरल वॉटर प्रकल्प उभारणार आहे.