ऑन दि स्पॉट निसर्गचित्र स्पर्धेत 82 स्पर्धकांचा सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मध्ये ऑन दि स्पॉट निसर्ग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत देशभरातील 82 स्पर्धकांनी सहभाग घेत माथेरान मधील विविध भागात बसून चित्रे साकारली आणि माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर आला. दम्यान, गेली दोन दिवस माथेरान मधील कलाप्रेमी प्रसाद सावंत यांनी ही स्पर्धा सलग चौथ्या वर्षी भरविली, त्यास उदंड प्रतिसाद लाभला.

दिशा क्लासेस आणि चित्रकार जितेंद्र गायकवाड यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा रंगली. निसर्गरम्य पर्यटनस्थळाची ख्याती आणि पर्यटन वाढावे या उदात्त हेतूने माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर उतरविण्यासाठी निसर्गचित्र स्पर्धा आयोजित केली होती. या ऑन दि स्पॉट निसर्गचित्र स्पर्धेत गोवा, छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश आणि कोलकाता तसेच राज्याच्या विविध भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी सहभागी होणारे स्पर्धकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजक प्रसाद सावंत मित्रपरिवार यांच्याकडून करण्यात आली आहे.
या स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्टिस्ट अभिषेक आचार्य आणि आघाडीचे चित्रकार पुरेंद्र देवगिरीकर लॅन्डस्केप डेमो केले. स्पर्धेत सहभागी चित्रकार यात 70 टक्के विद्यार्थी आणि 30 टक्के हे व्यवसायिक चित्रकार होते. त्या स्पर्धक चित्रकार यांनी माथेरान मध्ये विविध 82 स्पॉट वर बसून चित्रे रेखाटली आणि त्या चित्रांचे प्रदर्शन श्रीराम चौक येथे भरविण्यात आले. तेथे या सर्व चित्रांचे परीक्षण आघाडीचे चित्रकार अभिषेक आचार्य आणि नाशिक येथील पुरेंद्र देवगिरीकर यांनी परीक्षण केले आणि त्यांनी निकाल जाहीर केला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरणप्रसंगी प्रशासक सुरेखा भणगे, पोलीस अधिकारी शेखर लव्हे माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, माथेरान पतसंस्थेचे सभापती अजय सावंत, उपसभापती विनंती घावरे, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, आयोजक प्रसाद सावंत, योगेश जाधव तसेच सुनील शिंदे, कुलदीप जाधव यांच्यासह माथेरान मधील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माथेरान मधील निसर्ग हा दर महिन्यात वेगवेगळा असतो. मात्र अशी स्पर्धा आयोजकांनी तीन महिन्यातून एकदा तरी घ्यावी आणि प्रत्येक ऋतूत बदलला जाणारा निसर्ग हा चित्रात उतरणार आहे. त्याचवेळी माथेरान मधील निसर्ग हा वेगवेगळया हंगामात वेगळा अनुभव देणारा असतो, हे आपल्याला चित्रांची फारशी माहिती नसली तरी चित्राकडे बघून समजू शकते.
सुरेखा भणगे, मुख्याधिकारी
माथेरान या निमित्तानं कॅनव्हासवर उतरून त्यांचे संग्रहीकरण करणेसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे.
प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष
पारितोषिक विजेते चित्रकार
प्रथम – दीपक सावंत पुणे, द्वितीय – दिनेश चौधरी डोंबिवली, तृतीय – वैभव गायकवाड नाशिक, उत्तेजनार्थ – प्रवीण कारंडे डोंबिवली, विनय म्हात्रे डोंबिवली